Post office superhit scheme : पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना! 50 रुपये जमा करून मिळतील 35 लाख; जाणून घ्या

MHLive24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- सध्या अनेकांना गुंतवणूक करायची असते. कोरोनाने गुंतवणूकीचे महत्व सर्वाना पटवून दिले आहे. परंतु अनेकदा गुंतवणूक करताना रिस्क फॅक्टर फार महत्वाचा आहे.(Post office superhit scheme)

कारण अनेक ठिकाणी पैसे बुडण्याची भीती असते. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

वास्तविक, कोणत्याही गुंतवणुकीशी संबंधित रिस्क हा घटक असतोच. पण, रिस्क घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते.

Advertisement

अशा परिस्थितीत, तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला कसल्याही रिस्क शिवाय चांगले परतावा मिळेल.

तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल कि जिथे चांगला नफा मिळेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे.

35 लाख रुपये मिळतील

Advertisement

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि रिटर्नही चांगला मिळतो. आम्‍ही तुम्‍हाला एक अशी गुंतवणूक सांगणार आहोत ज्यात जोखीम नगण्य असते आणि परतावाही चांगला असतो.

आम्ही पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजने’बद्दल याठिकाणी सांगणार आहोत. इंडिया पोस्टने ऑफर केलेली ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता.

या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला आगामी काळात 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.

Advertisement

हे आहेत गुंतवणुकीचे नियम

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते.
या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांची सूट मिळते.
या योजनेवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.
ही योजना घेतल्यानंतर तुम्ही 3 वर्षांनी ते सरेंडर देखील करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

इतका होईल फायदा

Advertisement

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांनंतर 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker