Post office investment plan : पोस्टाची ही गुंतवणूक योजना तुम्हाला करेल मालामाल !

MHLive24 टीम, 06 जानेवारी 2022 :- किसान विकास पत्र (KVP) ची सुविधा देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते. तुम्ही यापैकी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र खरेदी करू शकता.(Post office investment plan)

तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही किसान विकास पत्राचा लाभ घेऊ शकता. सिंगल व्यतिरिक्त यामध्ये संयुक्त खाते उघडण्याचाही पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस लहान बचत असणाऱ्यांसाठी अनेक योजना आखते. यापैकी एक योजना म्हणजे किसान विकास पत्र. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. या योजनेत गुंतवलेले तुमचे पैसे १२४ महिन्यांत दुप्पट होतात.

Advertisement

आयकराच्या कलम 80C अंतर्गत, किसान विकास पत्रामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर करातून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही एकदाच पैसे गुंतवू शकता. कमीत कमी १००० हजार आणि जास्तीत जास्त कितीही गंतवणूक करू शकता.

शाखा बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे

तुम्हीदेशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र खरेदी करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करण्याचीही सुविधा आहे. म्हणजेच काही कारणास्तव तुमचे शहर बदलले तर तुम्ही ते नवीन शहरातील जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करू शकता.

Advertisement

अडीच वर्षांनंतर केव्हाही रोख रक्कम काढता येते

ही योजना कोणत्याही FD पेक्षा जास्त परतावा देऊ शकते. यासाठी मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे, परंतु गरज भासल्यास तुम्ही तुमची गुंतवणूक त्यापूर्वीच कॅश करू शकता. या योजनेत एकच अट आहे की ती 30 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीसह येते.

जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही

Advertisement

ही एकवेळ गुंतवणूक योजना आहे. म्हणजेच दर महिन्याला किंवा दरवर्षी त्यात पैसे टाकण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकावेळी कितीही रक्कम गुंतवू शकता.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker