Expensive poison : काय सांगता ! विष देखील विकलं जातंय; किंमत 75 कोटी रुपये प्रति लीटर

MHLive24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- विष म्हटलं की समोर उभा राहतो फक्त मृत्यू. पण तुम्हाला माहित आहे का कि विष देखील बाजारात विकले जाते तेही कोट्यवधींच्या घरात ? ऐकून धक्का बसला ना ? पण हे खरे आहे. जगात एक असा विंचू आहे, जो सर्वाधिक विषारी आहे. आणि त्याच्या विषाची किंमतही सर्वाधिक आहे.(Expensive poison)

चला जाणून घेऊयात… निळ्या विंचवाच्या विषापासून विडसटॉक्स नावाचं औषध तयार केलं जातं. आणि हे औषध कॅन्सरसारखा आजार मुळातून नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. या औषधाला क्यूबामध्ये चमत्कारी औषध मानलं जातं.

किंग कोब्राच्या विषाला 30 ते 32 कोटी रुपये प्रति लीटर इतका खर्च करतात. तर या निळ्या विंचूच्या विषासाठी तब्बल 75 कोटी रुपये प्रति लीटर इतकी जबरदस्त रक्कम आकारली जाते.

Advertisement

या विंचवाच्या विषामध्ये 50 लाखाहून वेगवेगळे घटक असून त्यांचा वापर हा वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीसाठी होतो. यातील अनेक घटकांबाबत अजूनही अभ्यास सुरु असल्याचं सांगितलं जातंय.

मध्यंतरी एक वृत्त आले होते इजिप्तमध्ये राहणारे मोहम्मद हमदी विंचवाचे विष विकून एका वेळीच ७३ लाख रूपये कमावतो. त्याच्या हा अनोखा छंद त्याला एकदिवस इतके यशस्वी आणि श्रीमंत करेल असे त्याला वाटले नव्हते.

१ ग्रॅम विषासाठी मोहम्मद तब्बल ७३ लाख रूपये कमावतो. गेल्या अनेक वर्षांपासून इजिप्तच्या वाळवंटात आणि किनारी भागात विंचू पकडण्याचा छंद होता. आर्कियोलॉजीमध्ये डिग्री मिळवलेला मोहम्मद विंचवाचे विष काढून त्यापासून ओषधे तयार करतो.

Advertisement

वयाच्या २५व्या वर्षीच मोहम्मद कायरो वेनोम कंपनीचा मालक बनला. हे एक असे ठिकाण आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे ८० हजारांहून अधिक विंचू आणि साप ठेवले जातात. या सापांचे आणि विंचूचे विष काढून त्यापासून ओषधे तयार करून ती विविध कंपन्यांना विकली जातात.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker