Fixed Deposit : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँका सध्या आपले व्याजदर वाढवत आहेत. अशातच मागच्या काही दिवसात अनेक बॅंकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केलेली आहे.
FD मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित असते आणि परतावाही आधीच ठरलेला असतो.
वास्तविक फिक्स्ड डिपॉझिट ही अशी गुंतवणूक आहे जिथे परताव्याची हमी असते. हेच कारण आहे की आजही मोठ्या संख्येने लोक देशातील विविध बँकांमध्ये मुदत ठेवी (FD) मध्ये गुंतवणूक करतात.
अलीकडे अनेक बँकांनी एफडीचे दर बदलले आहेत. सामान्य नागरिकांना गुंतवणुकीवर उत्तम परतावा कुठे मिळेल ते आपण जाणून घेऊया
पंजाब नॅशनल बँक मुदत ठेव दर
7 दिवस ते 45 दिवस FDs – 3:00%
46 दिवस ते 90 दिवस FD – 3.25%
91 दिवस ते 179 दिवस FD – 4.00%
180 दिवस ते 270 दिवस FD – 4.50%
271 दिवस ते 1 वर्षाच्या FD वर 4.50%
1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 5.10%
व्याज – 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर 5.10%
3 वर्ष ते 5 वर्षांच्या FD वर 5.10%
5 वर्षांच्या FD वर 5.25%
10 वर्षांपर्यंत – 5.25%
ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 बेसिस पॉइंट्स अतिरिक्त
IDFC फर्स्ट बँक मुदत ठेव दर
7 दिवस ते 29 दिवस FDs – 3.50%
30 ते 90 दिवस FDs – 4.00%
91 दिवस ते 180 दिवस FDs – 4.50%
181 दिवस ते 1 वर्ष FDs – 5.75%
1 वर्ष ते 2 वर्षे FDs वर – 6.00%
3 वर्षांच्या FD वर 6.00%
1 दिवस ते 5 वर्षांपर्यंत – 6.25%
HDFC बँक मुदत ठेव दर
7 दिवस ते 29 दिवस FDs – 2.50%
30 दिवस ते 90 दिवस FDs – 3.00%
91 दिवस ते 120 दिवस FDs – 3.50%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 4.40%
9 महिने 1 दिवस FDs एका वर्षापेक्षा कमी – 4.45%
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर 5.10%
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर 5.10%
3 वर्ष 1 दिवसापासून 5.40%
5 वर्षांपर्यंतच्या FD वर – 5.60%
1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत – 5.75%