‘ह्या’ बँकेची भन्नाट स्कीम ! घरात असलेले सोने ठेवा बँकेत, लॉकरचा चार्ज लागणार नाही , उलट तुम्हालाच मिळतील व्याजरूपी पैसे

MHLive24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  भारत हा जगातील सोन्याची सर्वाधिक आयात करणारा दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. सोन्यातून नफा मिळवण्याऐवजी अडचणीच्या प्रसंगी गरज पडल्यास त्याचा वापर करता यावा या हेतूनं त्यात गुंतवणुक केली जाते. अडचणीच्या वेळी सोनं विकणं हा सर्वात शेवटचा मार्ग असतो. ( PNB Bank’s Gold Monetization Scheme )

तसेच सण असो व उत्सव सोन्याला फार मागणी असते. यापैकी बहुतांश सोनं वर्षानुवर्षे कपाटाच्या लॉकरमध्ये पडून राहते. त्यावर कोणताही परतावा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काहीप्रमाणात डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते. परंतु आता पंजाब नॅशनल बँकेने घरातील सोन्यावर पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. PNB बँकेच्या Gold Monetization Scheme मध्ये सोनं ठेवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवल्यास त्यातून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. उलट खर्च आणि जोखीम वाढते. तुम्ही घरात पडून असणारं सोनं RBI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता.

Advertisement

ही सुविधा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत (Gold Monetization Scheme) मिळते. ही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट सारखीच योजना आहे. या योजनेद्वारे घरात पडून असलेले सोने बँकेत जमा केले जाते आणि ठराविक मुदतीनंतर ते सोने किंवा सोन्याचे मूल्य व्याजासह परत मिळते.

किमान किती सोनं जमा करावं लागेल ? :- सोने चोरीला जाण्याची जोखीम असल्यामुळे अनेकजण ते बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवतात. त्यासाठी तुम्हाला बँकेला शुल्क अदा करावे लागते. मात्र, तुम्ही PNB बँकेच्या सोने चलनीकरण योजनेतंर्गत गुंतवणूक करायची ठरवली तर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी वेगळे बँक लॉकर खरेदी करण्याची गरज उरणार नाही. तसेच तुम्हाला ठराविक व्याजही मिळत राहील. या योजनेत तुम्ही अगदी एक तोळा सोनेही गुंतवू शकता.

PNB बँकेच्या Gold Monetization Scheme मध्ये तीन प्रकार आहेत. शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटमध्ये (STBD) 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही सोनं बँकेत गुंतवू शकता. तर मध्यम आणि दीर्घकालीन Gold Monetization Scheme चा कालावधी अनुक्रमे 5 ते 7 वर्षे आणि 12 ते 15 वर्षे इतका आहे.

Advertisement

किती व्याज मिळणार ? :- PNB बँकेच्या या योजनेत एका वर्षासाठी 0.50 टक्के ते 0.75 टक्के इतके व्याज मिळेल. एका वर्षापेक्षा जास्त पण दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर 2.25 टक्के इतका राहील. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी 2.50 टक्के इतके व्याज मिळेल. Gold Monetization Scheme मध्ये तुम्ही सोन्याची नाणी, वळी आणि दागिने गुंतवू शकता. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना अर्ज, ओळखपत्र, केवायसी आणि इन्व्हेंटरी फॉर्म भरावा लागेल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker