आता कोंबड्याच्या कचऱ्यापासून निर्माण होणार पेट्रोल; भारतातील पशुवैद्यकीय डॉक्टरने केली कमाल

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- केरळचे पशुवैद्य जॉन अब्राहम यांनी एक अविष्कार केला आहे. कोंबड्यांच्या कचऱ्यापासून बायोडिझल बनवण्याचे पेटंट त्यांनी मिळवले आहे. हे बायोडीझल इंधन प्रतिलिटर सरासरी 38 कि.मी.पेक्षा जास्त मायलेज देते आणि त्याची किंमत सध्याच्या डिझेलच्या 40 टक्क्यांपर्यंत असेल आणि यामुळे प्रदूषण देखील कमी होते.

केरळ पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक अब्राहम यांनी सांगितले की, त्यांना साडेसात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षानंतर 7 जुलै 2021 रोजी भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट देण्यात आले.

कोंबडीच्या पोटामधून निघालेली घाण :- कत्तल झालेल्या कोंबड्यांच्या कचर्यातून काढलेल्या तेलामधून बायो डीझेलचा शोध अब्राहमने शोधला. त्यांनी सांगितले की त्यांनी याचा शोध 2009 -12 दरम्यानच लावला. दिवंगत प्रोफेसर रमेश श्रावणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. संशोधनानंतर अब्राहमने 2014 मध्ये वायनाडमधील कलपेट्टा जवळील पोकोडे वेटेरिनरी कॉलेज मध्ये 18 लाख रुपये खर्च करून एक प्रयोगात्मक संयंत्र स्थापित केले.

Advertisement

अ‍ॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूट कडून मिळाला फंड :- यासाठी त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेचा फंड मिळाला आहे. त्यानंतर भारत पेट्रोलियमच्या कोची-स्थित रिफायनरीने एप्रिल 2015 मध्ये अब्राहमच्या बायो डिझेलला गुणवत्ता प्रमाणपत्र दिले आणि त्यानंतर कॉलेजमधील एक वाहन त्याच इंधनावर चालू आहे.

फॅट जमा होण्यास सुलभता :- इंधनासाठी ते फक्त कोंबड्यांचा कचरा का वापरता असे विचारले असता, अब्राहम म्हणाले की पक्षी आणि डुकरांच्या पोटात चरबी भरपूर प्रमाणात होते आणि यामुळे सामान्य तापमानात त्यांच्याकडून तेल काढणे सोपे आहे.

अब्राहम आणि त्याचे विद्यार्थी आता डुक्कर कचर्‍यापासून बायोडीझेल बनवण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत. ते म्हणाले की, कसाई घरांमधून 100 किलो पोल्ट्री कचऱ्यापासून एक लिटर बायो-डिझेल तयार केले जाऊ शकते.

Advertisement

चांगले मायलेज, कमी प्रदूषण :-  डॉ. अब्राहम यांनी सांगितले की कोंबडीच्या कचर्‍यामध्ये अंदाजे 62% चरबी असते, ज्यामधून एनर्जी कंटेंट चा मुख्य अवयव सिटेन 72 व्या लेवलला आढळतो, तर सामान्य डिझेलमध्ये तो केवळ 64 च्या पातळीवर असतो. पोल्ट्री कचऱ्या पासून बनविलेले बायोडीझल वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता 11% वाढते. यासह वाहनातून निघणारा धूर 47 टक्क्यांनी कमी होतो.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker