पेट्रोल डिझेलचे भाव हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. वाढणारे पेट्रोल डिझेलचे भाव हे त्यांच्या आर्थिक बजेट साठी एकप्रकारे त्रासदायक ठरतात.

अशातच आपण पेट्रोल डिझेलबाबत काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. वास्तविक उन्हाळ्यात पेट्रोल किंवा डिझेलची संपूर्ण टाकी भरणे धोकादायक ठरू शकते.

तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर जरा सावध राहा. वास्तविक, इंडिया ऑइलने अशा संदेशांना बनावट म्हटले आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलची टाकी भरणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय म्हटलंय मेसेजमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये येत्या काही दिवसांत तापमान वाढणार असल्याचं म्हटलं आहे. जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत तुमच्या वाहनात पेट्रोल भरू नका. यामुळे स्फोट होऊ शकतो. या आठवड्यात टाकी भरल्यामुळे चार स्फोट झाल्याचे व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे. यासोबतच टाकी उघडी ठेवून हवा येऊ द्यावी, असा सल्ला दिला जातो.

इंडियन ऑइलचा इन्कार इंडियन ऑइलने या अफवांचे खंडन केले आहे. गाडीची टाकी भरता येते. कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हिवाळा किंवा उन्हाळा याची पर्वा न करता जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत वाहनांमध्ये इंधन भरणे पूर्णपणे सुरक्षित आहे.