पेट्रोल-डिझेलच्या महागाईतून मिळणार दिलासा! आता तुमची गाडी पाण्यावर धावेल, पीएम मोदींची मोठी घोषणा

MHLive24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी लागेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 12 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो. साहजिकच, भारत आपल्या एकूण पेट्रोलियम आणि इतर ऊर्जेच्या गरजांपैकी सुमारे 85 टक्के आयात करतो. दुसरीकडे, नैसर्गिक वायूच्या बाबतीत, गरजेच्या अर्ध्या भाग परदेशातून पुरवठा होतो.

पंतप्रधानांनी घोषणा केली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी भारताची ऊर्जा पर्याप्तता आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या गरजेवर भर दिला आणि भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Advertisement

राष्ट्रीय हायड्रोजन मिशन जाहीर केले :- ते म्हणाले की आज देशात होत असलेल्या सर्व कार्यक्रमांपैकी जे भारताला मोठी झेप घेण्यास मदत करेल, ते म्हणजे ग्रीन हायड्रोजनचे क्षेत्र. पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्रीय ध्वजाखाली मी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. भारताला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

पाण्यावर चालणारी कार :- सध्या भारतात हायड्रोजन वायू बनवण्यासाठी दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. यापैकी एका पद्धतीमध्ये, हायड्रोजन पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून वेगळे केले जाते. म्हणजेच पाण्याच्या मदतीने बनवलेल्या हायड्रोडॉनने कार चालवता येतील. तथापि, ही पद्धत केवळ त्या कारसाठीच शक्य होईल, जे हायड्रोजन गॅस इंधनास स्पोर्ट करतात. इतर मार्गांनी, नैसर्गिक वायूचे हायड्रोजन आणि कार्बनमध्ये विभाजन होते. यातून मिळणारे हायड्रोजन इंधन म्हणून वापरले जाते.

ऊर्जेच्या बाबतीत आत्मिनर्भर होण्याची घोषणा :- प्रधानमंत्री गतीशक्ती- राष्ट्रीय मास्टर प्लॅन विमानतळ, नवीन रस्ते आणि रेल्वे योजनांसह वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि औद्योगिक उपक्रमांना चालना देईल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल. पंतप्रधानांनी 2047 पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याची घोषणा केली.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker