पेट्रोल 28 रुपयांनी महाग झाले; कच्चे तेल स्वस्त असतानाही वाढतायेत दर, आकडेवारीद्वारे जाणून घ्या कसा वाढतॊय महागाईचा भार

MHLive24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- 35 दिवसांच्या शांततेनंतर काल म्हणजेच रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 20 पैशांनी कपात करण्यात आली. मात्र, डिझेलच्या दरात 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत सतत कपात करण्यात आली आणि कालच्या कपातीनंतर डिझेल 80 पैशांनी स्वस्त झाले आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

1 वर्षात पेट्रोल 28.08 रुपयांनी महागले :- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 66 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे. या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत पेट्रोलचे दर 38% वाढले आहेत.

मार्च आणि एप्रिलमध्ये, जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार होत्या, तेव्हा भाव स्थिर राहिले. उलट, मार्चमध्ये तीन वेळा आणि एप्रिलमध्ये एकदा कमी झाले. एका वर्षात पेट्रोलचे दर 28.08 रुपयांनी वाढले आहेत. 23 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 73.56 रुपये होता.

Advertisement

मागील महिन्यात पेट्रोल 3.30 रुपयांनी महाग झाले :- जुलै महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 3.30 रुपयांची तर डिझेल 69 पैशांनी महाग झाले. सुमारे 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. ज्यामध्ये चार महानगरांव्यतिरिक्त तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, जम्मू आणि काश्मीरचा समावेश आहे.

जूनमध्ये पेट्रोल 4.32 रुपयांनी महागले :- जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 16 वेळा वाढ करण्यात आली होती. जूनमध्ये पेट्रोल 4.32 रुपयांनी महाग झाले. 1 जून रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.49 रुपये प्रति लीटर होता, 30 जून रोजी हा दर 98.81 रुपये होता. तर डिझेल 3.80 रुपयांनी महाग झाले आहे. 1 जून रोजी दिल्लीत डिझेलचा दर 85.38 रुपये होता, 30 जून रोजी हा दर 89.18 रुपये होता.

केंद्र आणि राज्य सरकार भारी कर आकारतात :- पेट्रोलच्या किंमतीच्या 60 टक्के हिस्सा केंद्रीय उत्पादन आणि राज्य करांचा असतो, तर डिझेलचा 54 टक्के आहे. पेट्रोलवर केंद्रीय उत्पादन शुल्क 32.90 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेलवर 31.80 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती साधारणपणे दररोज बदलतात, या किमती बेंचमार्क आंतरराष्ट्रीय कच्च्या किंमती आणि परकीय चलन दरावर आधारित असतात.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker