जोडप्यांच्या किसिंगला पाहून वैतागले लोक

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- गंमतीशीर पाट्या आणि पुणे हे समीकरण झाले असले, तरी त्यात आता मुंबईकरही मागे राहिलेले नाही. बोरिवलीच्या जाॅगिग पार्कमध्ये नो किसिंग झोनच्या पाट्या वाचून त्या वाचणा-यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाही.

“नो किसिंग झोन” :- आतापर्यंत नो हॉर्न, सायलेंट झोन, नो पार्किंगच्या पाट्या पाहतो; मात्र बोरिवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत. बोरिवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात; मात्र इथं “नो किसिंग झोन”फलक लागले आहेत.

या जॉगर्स पार्कमध्ये अनेक जोडपी येत असतात. त्यांचे किसिंग पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळले आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ असं लिहिलं.

Advertisement

रोज ‘हे’ पाहून हैराण :- जॉगर्स पार्कचा हा परिसर बोरिवलीचा हाय प्रोफाईल परिसर आहे. याच हाय प्रोफाईल जागेमध्ये एक उद्यान बनवलं आहे. या गार्डनमध्ये रोज जोडपी येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात. कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहतात आणि किसिंग करतात. यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती मात्र रोज हे पाहून हैराण झाले.

किसिंगचे प्रकार बंद :- किसिंगचे वाढणारे हे प्रकार लक्षात घेता सोसायटीतल्या लोकांनी आता एक नामी शक्कल लढवली. या किसिंग करणाऱ्या जोडप्यांना वेसण घालण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ अशी जाहीर सूचना लिहिली. हा मेसेज लिहिल्यानंतर या भागामध्ये जोडपी कमी झाली आणि किसिंगचे प्रकारही बंद झाले आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker