पटोले म्हणतात, ‘मी टिळकंसारखा जहाल’

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- काही लोक माझ्याविरोधात दिल्लीत तक्रार करतात, मी जहाल असल्याचं म्हणतात; पण मी टिळकांसारखा जहाल गटात मोडतोय, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यत्क्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय नेत्यांवर टीका केली.

‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाची सुरुवात :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाची आज सुरुवात करण्यात आली. या वेळी पटोले यांनी भाजप आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.

देशात सध्या हुकूमशाही सुरू आहे. विरोधकांवर कारवाई करत त्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे आपल्याला दुसरा स्वातंत्र्य लढा सुरू करावा लागेल, असं पटोले म्हणाले.

Advertisement

मोदी सरकारविरोधातील लढा सुरू :- लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधातील लढ्याची सुरुवातही टिळक वाड्यातून करूयात. हा देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढाच म्हणा फारतर; पण ही लढाई आपण पुन्हा लढुयात आणि जिंकूयात, असं आवाहन पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं.

देशात हुकूमशाही सुरू :- चीन आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी काही बोलत नाही. आवाज उठवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यात काहीही फरक राहिला नाही. देशात हुकूमशाही सुरू आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांचीच बदनामी केली जात आहे, असंही ते म्हणाले.

राज्यपालांवर टीका :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरूमुळे देशाचं वाटोळं झाले हे राज्यपालांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. राज्यपाल भवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही. मी विधानसभेतही बोललो होतो. राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ता असल्यासारखे वागतात, असा आरोप पटोले यांनी केला.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker