पटोले म्हणाले, ‘तेच निघाले भारतमातेला विकायला!’

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही, ते लोक इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडून लोकांची दिशाभूल करीत आहेत.

ज्यांनी भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवली, तेच आता भारतमातेला विकायला निघाले आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाचे उद्घाटन :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाचे उद्‌घाटन पुण्यातील केसरी वाड्यातून करण्यात आले.

Advertisement

त्या वेळी ते बोलत होते. पटोले पुढे म्हणाले, की, इंग्रजांचे सरकार जुलमी, अन्यायी अत्याचारी होते, स्वातंत्र्यचळवळ मोडून काढण्यासाठी त्यांनी अनन्वीत अत्याचार केले पण लोक डगमगले नाहीत.

केंद्रातील सरकार इंग्रज सरकारपेक्षा काही वेगळे नाही :- गो-या पोलिसांच्या गोळ्यांनाही घाबरले नाहीत. ते परकीय होते; पण आत्ताचे केंद्रातील सरकार इंग्रज सरकारपेक्षा काही वेगळे नाही. इंग्रज शासक व आत्ताचे सत्ताधारी सारखेच आहेत. तेही जुलुम करायचे आणि हेही तेच करत आहेत.

लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकार विरोधात ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’? असा जळजळीत लेख लिहिला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. आजचे सरकारही तेच करत आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवणा-यांचा आवाज दाबला जात आहे. प्रसारमाध्यमांचीही मुस्कटदाबी केली जात आहे, अशी टीका पटोले यांनी केला. अधोरेखित केलंय.

स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचे काम :- जो सरकारच्या विरोधात बोलेल, लिखाण करेल त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे. जेथे अन्याय दिसेल त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे.

लोकशाहीच्या चार स्तंभातील न्यायपालिकेची अवस्था काय करून ठेवली आहे हे आपण पहातच आहोत. स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदू मुस्लिम असा भेदभाव कोणी केला नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग घेतला; परंतु सध्या हिंदू मुस्लिम भेदभाव करून समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

Advertisement

पटोलेंच्या हस्ते सत्कार :- याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे हुतात्मा राजगुरु, नारायण दाभाडे, शंकरराव मोरे, जेधे, टिळक, मर्चंट, फडके आदी स्वातंत्र्यलढ्यातील कुटुंबीयांच्या वंशजांचा तसेच उषा देसाई, रामभाऊ जोशी, वैद बंधू या स्वातंत्र्यसैनिकांचा पटोले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसचे योगदान दर्शविणाऱ्या एका शॉर्टफिल्मचे अनावरण करण्यात आले.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker