रुग्णाने केला रुग्णाचा खून ! शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार..

MHLive24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- सोलापुरातल्या श्री.छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून एका रुग्णाने एका रुग्णाचा सलाईन च्या रॉडने मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, काल रात्रीचा हा धक्कादायक प्रकार असून उपचारादरम्यान 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.(Patient killed patient)

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक मधील हा धक्कादायक प्रकार आहे, गेल्या काही महिन्यापासून 108 रुग्णवाहिकेत च्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या 70 वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले.

आणि याच  वॉर्डात  फुप्फुसाच्या विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला दाखल करण्यात आले होते, काल रात्री याच युसूफ पिरजादेने सलाईनच्या रॉडने मारहाण केली.

Advertisement

यात 70 वर्षीय  बेघर जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी ट्रॉमा केअर येथे दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker