मुंब्रा येथील इमारतीचा भाग खचला; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- मुंब्रा इथं स्वस्तिक इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील भाग खचल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकूरपाडामधील स्वस्तिक इमारत ही एका मोठ्या नाल्याच्या बाजूला बांधली गेल्याने इथल्या रहिवाशांच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती.

केवळ दहा वर्षे जुन्या असलेल्या या आठ मजली इमारतीत तब्बल 40 फ्लॅट्स आहेत. इमारतीच्या गेटसमोर असलेल्या नाल्याच्या बाजूला मोठं भगदाड पडल्यामुळे या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.

आठ मजली इमारत धोकादायक :- राज्यात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. भूस्खलन आणि दरड कोसळून रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अशावेळी ठाण्यातील मुंब्रामध्ये ठाकूरपाडानजीक असलेल्या आठ मजली स्वस्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या कारणासाठी सील करण्यात आल्या आहेत. पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं.

Advertisement

रहिवाशांना काढले सुखरूप बाहेर :- इमारतीला असलेला धोका पाहता घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या सर्वांना जवळच्या महापालिका शाळेत ठेवण्यात आले आहे. ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.

१४२ कुटुंबांचे स्थलांतर :- स्वस्तिक इमारतीमध्ये राहणारे 69 कुटुंब, कोकण नागरी इमारतीमधील 63 कुटुंब आणि जयराम भगत चाळीत राहणाऱ्या 7 कुटुंबाला जवळच्या महापालिका शाळेत ठेवण्यात आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही संपूर्ण इमारत सील केली आहे. त्यानंतर खचलेल्या भागत दगड टाकण्यात आले आहेत.

ठाण्यात इमारतीची भिंत कोसळली :- 19 जुलै रोजी ठाण्यात मुसळधार पावसामुळे एका इमारतीची भिंत कोसळून अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं होतं. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.

Advertisement

नेमकं काय घडलं? :- ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला भागातील कॉसमॉस इमातीत ही दुर्घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या पथकासह जेसीबी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker