खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा आदेश

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने खासगी शाळांच्या फीमध्ये १६ टक्के कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

लवकरच अध्यादेश :- सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी असे महाराष्ट्र सरकारला आदेश दिले होते. कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 15 टक्के फी माफीबद्दल लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचं ही कळतंय.

Advertisement

फी कपातीचा तात्पुरता अधिकार :- कोरोना काळात शाळा बंद असल्याने खासगी शाळांनी फीमध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत सरकारकडून अध्यादेश काढला जाऊ शकतो. खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही; मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत. त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.

मोठा दिलासा :- कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. पालकांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर एक निवेदन प्रकाशित केले. कोरोना कालावधीत सुविधांचा वापर होत नसल्याने शाळांना फी वाढ करण्यास बंदी करावी, शाळांचे शुल्क कमी करावे ही पालकांची मागणी मान्य करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता, असे या निवेदनात म्हटले आहे.

मुख्य याचिकाकर्ते कोण ? :- जयश्री देशपांडे, प्रसाद तुळसकर, योगेश पाठक, प्रदीप यादव, निलेश साळुंखे, सुनील चौधरी, हरीश वाघ, राजेश बडनखे, दिपाली सरदेशमुख, कालिदास जाधव, संजय बोत्रे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker