जर ५० टक्के लोकांना कोरोनाची बाधा झाली तरच…; WHO म्हणतंय..

MhLive24 टीम , 26 जुलै  2020 :- सध्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. विविध उपाय योजना करूनही बाधितांची संख्या वाढतच आहे. यावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यावर बऱ्याचदा WHO अनेक खुलासे करत असते.

आता WHO ने पुन्हा नवीन खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशा संख्येने लोक सक्षम होतात, त्यावेळी तयार होणारी सामूहिक रोगप्रतिकारशक्ती कोरोनासंदर्भात अद्याप निर्माण झाली नाही.

त्यासाठी आणखी बराच वेळ लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या,

Advertisement

५० ते ६० टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन ते त्याचा सामना करतील, त्यानंतर सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल.

कोरोना साथीच्या आणखी काही फेऱ्या आल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढेपर्यंत पुढील वर्षभर ही साथ आटोक्यात ठेवण्याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker