वळणावरच्या रस्त्याने एकाचा बळी

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- फलटण रस्त्यावरील वळणावर अज्ञात वाहन व दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. बबलू जीतमलजी बंजारा (वय २८, रा. लोहारदे जि. झारवाड़, राजस्थान) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

जरांडे वस्तीजवळ अपघात :- अज्ञात वाहन चालकाने अपघातानंतर धूम ठोकली. बबलू हा दुचाकीवरून दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला फलटणच्या दिशेकडून बारामतीकडे जात होता. शिरवलीजवळील जरांडेवस्ती येथील चारीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात तरुण जागीच मरण पावला. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. तरुणाच्या दोन साथीदारांना किरकोळ दुखापत झाली.

खड्डे, झाडी अपघातास जबाबदार :- जखमी व मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी स्थानिक तरुणांनी या वेळी मदत केली. वारंवार होणाऱ्या अपघातास प्रशासन जबाबदार असून रस्त्यावरील पडलेले खड्डे, दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे-झुडपे वाहनचालकांच्या मृत्यूस आता कारणीभूत ठरू लागली आहेत.

Advertisement

निष्पाप लोकांचे बळी :- मागील काही वर्षांच्या कालावधीत रखडलेल्या बारामती फलटण रस्त्याने कित्येक निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत.तर सध्या या रस्त्याच्या कडेने अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. नवीन चालकांना याचा अंदाज न आल्याने अनेकदा समोरील वाहनांवर जात असतात.

यामुळे सातत्याने अपघात वाढू लागले आहेत. तसेच पाहुणेवाडी येथील स्मशानभूमी समोर दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर जड वाहनांमुळे मोठे खड्डे निर्माण होतात. यामुळे याठिकाणी आपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker