सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला (Russia & Ukraine War Effect) एक महिना आणि एक हफ्ता उलटला आहे. या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर (Global Market) मोठा विपरीत परिणाम होत आहे.

जाणकार लोकांच्या मते, युद्धामुळे खाद्य तेलात तसेच इंधनाच्या दरात (Petrol Diesel Price Hike) देखील मोठी वाढ होत आहे.

याव्यतिरिक्त अन्नधान्य पुरवठा साखळी वर देखील याचा मोठा विपरित परिणाम झाला आहे. असे सांगितले जात आहे की युद्धामुळे मक्याच्या दरात (Maize Price) मोठी वाढ होत आहे.

एकीकडे मक्‍याचे दर वाढत असून मक्याचे उत्पादन (Maize Production) मागणी पूर्ण करण्यासाठी अक्षम आहे या बदललेल्या समीकरणामुळे कधी नव्हे ते तुकडा तांदळाच्या (Rice Rate) मागणीत मोठी वाढ झाली.

बाजारपेठेतील गणितानुसार, मागणीत वाढ झाली म्हणजे बाजार भावात देखील वाढ होते. मागणी आणि पुरवठा यामध्ये निर्माण झालेल्या तफावतीमुळे कधी नव्हे ते तुकडा तांदळाला 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे.

आशियाई देशात मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आशियाई देशात मोठ्या प्रमाणात कुकूटपालन व्यवसाय तसेच पशुपालन व्यवसायात पशुखाद्य म्हणून मक्याचा वापर केला जातो.

मात्र, मक्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे आणि युद्धामुळे मक्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून याला पर्यायी खाद्य म्हणून तुकडा तांदळाकडे आता पशुपालक शेतकरी वळू लागले आहेत.

सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे अन्नधान्य पुरवठा वर मोठा विपरित परिणाम झाला आहे यामुळे इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशातून आता मोठ्या प्रमाणात तुकडा तांदळाची मागणी होऊ लागल्याचे कोलकत्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

यावर्षी देशांतर्गत मक्याच्या उत्पादनात घट झाली जाणकार लोकांनी याचे कारण सांगताना नमूद केले की, यंदा मक्‍याच्या क्षेत्रात देशांतर्गत मोठी घट झाली.

खरीपातील मक्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. साठवणूक केलेला मका आता हमीभाव केंद्रावर दाखल होऊ लागला आहे. सध्या देशांतर्गत मक्केला अठराशे रुपये प्रति क्विंटल ते 2200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

याव्यतिरिक्त व्यापाऱ्यांनी कारण सांगितले की, रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मक्याच्या दरात वाढ झाली आहे कारण की युक्रेन हा जगातील एकूण मक्याच्या निर्यातीत 16 टक्के हिस्सेदारी ठेवतो.

युद्धामुळे युक्रेन देशातील निर्यातीची यंत्रणा पुरता कोलमडली आहे आणि म्हणूनच भारतीय बाजारपेठेत मक्याला सुवर्ण काळ आला आहे.

मक्याला तर चांगला अपेक्षित दर मिळत आहे याशिवाय तुकडा तांदळाची मागणी वाढली असून याच्याही दरात वाढ झाली आहे. एकंदरीत या वाढीव दराचा फायदा मका उत्पादक शेतकरी व तांदूळ उत्पादक शेतकरी घेत आहेत.

साधारणपणे चीन नेदरलँड आणि दक्षिण कोरिया हे देश युक्रेन मधून मक्याची आयात करत असतात मात्र युद्धामुळे यां देशात आयात ठप्प झाली आहे यामुळे भारतातून हे देश मोठ्या प्रमाणात मका आणि तुकडा तांदुळ आयात करीत आहेत.

विशेष म्हणजे या देशातून होत असलेली मागणीची भारत सहजरीत्या पूर्तता करीत आहे, कारण की भारताकडे या देशात माल पाठवण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था आहे. यामुळे नेहमी कवडीमोल दरात विकला जाणारा तुकडा तांदूळ मक्याच्या बरोबरीने विक्री होत आहे.