परमबीर सिंह यांच्याविरुद्ध आता ‘हा’ गुन्हा

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामागचे शुक्लकाष्ट काही संपायला तयार नाही. माजी गृहमंत्र्यांवर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप करणा-या परमबीर यांच्याविरोधात आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

खंडणीचा आरोप करणा-यांवरच खंडणीचा गुन्हा :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप परमबीर यांनी करून खळबळ उडवून दिली. सचिन वाझे यांच्यामार्फत ही वसुली केली जात होती, असा त्यांचा आरोप आहे.

परमबीर यांच्याविरोधात पूर्वीच अमरावती आणि ठाण्यात गुनहे दाखल असताना आता खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानं परमबीर अडचणीत आले आहेत.

Advertisement

बांधकाम व्यावसायिकाची फिर्याद :- ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर व अन्य पोलिस अधिका-यांविरोधात खंडणीची फिर्याद दिली होती. त्यात आठ जणांची नावे आहेत. परमबीर यांच्यासहइ इतर सहा जणांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असल्यानं प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.

आयुक्त पदावरून हटविल्यानंतर लेटर बाँब :- प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीसमोर स्फोटके भरलेली गाडी ठेवण्यात आली. यातील सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. वाझे थेट परमबीर यांना रिपोर्टिंग करायचे.

त्यामुळे परमबीर यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली; परंतु बदलीच्या ठिकाणी हजर न होता राजीनामा देऊन परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांनी चाैकशीची मागणी केली होती.

Advertisement

अटकेपासून संरक्षण :- या प्रकरणाचा सध्या ईडी व सीबीआय तपास करीत आहेत; परंतु परमबीर यांच्या विरोधातही त्यानंतर अनेक तक्रारी आल्या. त्यात काही तक्रारी तर पोलिस अधिका-यांनी केल्या आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधातही भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

अॅट्रॉसिटी अंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण मिळवले आहे. हे सगळे सुरू असतानाच आता ते आणखी एका प्रकरणात अडकले आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker