Indian Railways
Indian Railways

Indian Railways : भारतीय रेल्वे ही जगातील दुसरी सर्वात मोठी रेल्वेचे जाळे असणारी फर्म मानली जाते. जर तुम्ही हमखास ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत.

एकंदरीत पाहिलं तर देशात सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. वास्तविक रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे सतत नवनवीन सुविधा आणत आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास आरामदायी होईल.

प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे आता प्लॅटफॉर्म तिकीट आणि लोकल तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

कारण आता प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनमधून (एटीव्हीएम) तिकीट काढता येणार आहे.

भारतीय रेल्वेने QR कोड स्कॅनिंगद्वारे रेल्वे तिकीट बुक करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण रेल्वेनंतर आता उत्तर रेल्वेमध्येही सेवा सुरू होत असून प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी करता येणार आहे.

यासाठी पेमेंट पेटीएम, फोनपे आणि फ्रीचार्ज यांसारख्या UPI-आधारित मोबाइल अॅप्सद्वारे केले जाऊ शकते. आता लोकांची रोकड ठेवण्याच्या त्रासातूनही सुटका होणार आहे.

QR कोड कसा स्कॅन करायचा?

पायरी 1

प्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर UTS अॅप डाउनलोड करावे लागेल आणि नोंदणी आणि लॉगिन करावे लागेल.

पायरी 2

खाते तयार केल्यानंतर, बुक तिकीट मेनूखाली QR बुकिंगचा पर्याय उपलब्ध होईल.

पायरी 3

प्रवासी ठिकाण निवडून तिकीट बुक करू शकतात.

पायरी 4

UTS अॅप नंतर बुक केलेल्या तिकिटाचा QR कोड जनरेट करेल जो स्टेशनवर प्रवाशांना वापरता येईल.

पायरी 5

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच तिकीट मिळेल.

दक्षिण पश्चिम रेल्वेने 60 हून अधिक स्थानकांसाठी QR कोड तिकीट प्रणाली सुरू केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, बंगळुरूने 2018 मध्ये 13 स्थानकांवर ही सुविधा दिली.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या विचाराने उत्तर रेल्वेने QR कोडद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू केली होती. यासोबतच प्रवाशांना तिकिटांची चिंता करण्याची गरज नाही.