Employment for Woman : आपण अनेकदा नोकरी शोधत असतो, अनेकदा पुरेसे कौशल्य नसल्यामुळे आपण योग्य नोकरी मिळवण्यास मुकतो. परंतु आता भारतीय महीलासाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार होत आहे.

वास्तविक लिंक्डइन या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्कने युनायटेड नेशन वुमन (UN Women) सोबत भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. या भागीदारी अंतर्गत लिंक्डइन सुमारे 3.88 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यामध्ये लिंग समानतेसाठी लिंक्डइन काम करेल.

ही तीन वर्षांची भागीदारी असेल. हा प्रकल्प प्रथम महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 2000 महिलामध्ये डिजिटल, सॉफ्ट आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यासाठी काम केले जाणार आहे.

यानंतर त्यांना रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे आणि पीअर-टू-पीअर नेटवर्कच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

हा कार्यक्रम जुलै 2022 मध्ये सुरू होईल आणि ऑक्टोबर 2023 मध्ये संपेल. महिलांना अधिकाधिक नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आणि औपचारिक अर्थव्यवस्थेत पूर्णपणे सहभागी होण्यासाठी तयार केले जाईल.

त्यासाठी त्यांना डिजिटली कौशल्यपूर्ण बनवले जाईल. आशिया पॅसिफिक प्रदेशातील महिलांना पुरूषांच्या तुलनेत इंटरनेटवर लक्षणीयरीत्या कमी प्रवेश आहे.

अशा परिस्थितीत, आशिया पॅसिफिक प्रदेशात लैंगिक समानतेवर आधारित तंत्रज्ञान धोरण तयार करणे खूप कठीण होऊन बसते. या प्रदेशातील पुरुषांना 54.6% इंटरनेट सुविधा आहे.

तर महिलांचा इंटरनेटचा वापर 41.3% आहे. म्हणजेच स्त्री-पुरुषांमधील लैंगिक अंतर (लिंग समानता) 32 टक्के आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन (ITU) नुसार, आशियातील हे अंतर 2013-17 दरम्यान 15 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

तीन वर्षाचा प्रकल्प दोघांच्या भागीदारीचा हा प्रकल्प तीन वर्षांचा आहे. 15 महिन्यांच्या पायलटनंतर, UN Women आणि Linkedin आवश्यकतेनुसार त्यांचे कार्यक्रम सुधारतील. त्यानंतर ते आशिया-पॅसिफिकच्या इतर देशांमध्ये नेले जाईल.

लिंक्डइनचे व्यवस्थापक (भारत) आशुतोष गुप्ता यांच्या मते, यूएन वुमनच्या सहकार्याने डिजिटल क्षेत्रात महिलांना तयार केले जाईल.

मग औपचारिक अर्थव्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढेल. महिलांना योग्य कौशल्ये आणि संसाधने दिली जातील. हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नवी मुंबई येथे सुरू होणार आहे. उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या महिला अर्ज करू शकतात.