CNG Prices Increase : महागाईचा आणखी एक झटका ! आता CNG च्या किमती ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- महागाईने सर्वसामान्यांचा घाम काढला आहे. पेट्रो-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. आता यामुळे अनेकांनी सीएनजी वापरण्याकडे भर दिला. परंतु आता सीएनजी वापरणाऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी आहे.(CNG Prices Increase )

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर शनिवारी सकाळी 6 वाजता लागू झाले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 1 रुपये वाढ होईल. याशिवाय राजस्थान, हरियाणामध्येही नवीन दर लागू होतील.

दिल्लीत सीएनजी महाग

Advertisement

सरकारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने सर्वसामान्यांना मोठा झटका देत किमती वाढवल्या आहेत. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये शुक्रवारी IGL ने CNG च्या किमतीत सुधारणा केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्यानंतर आता सीएनजीच्या दरातही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन महिन्यांत चौथ्यांदा किमती वाढल्या

शनिवारपासून दिल्लीत सीएनजी 53.04 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होईल, तर गुरुग्राममध्ये त्याची किंमत 60.4 रुपये प्रति किलो असेल. त्याचप्रमाणे अजमेर, पालीसह राजस्थानमधील अनेक भागात सीएनजीची किंमत 67.31 रुपये प्रति किलो असेल.

Advertisement

यापूर्वी 14 नोव्हेंबरला IGL ने CNG च्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर दिल्लीत सीएनजीच्या दरात किलोमागे 2.28 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्येही सीएनजी प्रति किलो 2.56 रुपयांनी महागला आहे.

1 ऑक्टोबरनंतर सीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या या निर्णयानंतर इतर कंपन्याही सीएनजीच्या किमती वाढवू शकतात.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker