आता घरबसल्या करा ‘राजपत्रा’त नाव, वय आणि धर्मामध्ये बदल

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-  सरकारी राजपत्रात तुमचे नाव, धर्मात बदल तसेच जन्मतारीखेतील चूक दुरुस्ती करण्यासाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता. आता तुमचा वेळ वाचेल आणि ताटळत रांगेत उभे रहायची गरज नाही. कारण आम्ही आमची सेवा अगदी सोपी करुन दिली आहे. अगदी थोड्याश्या स्टेप्स मध्ये तुम्हांला ऑनलाइन अर्ज भरुन लवकरात लवकर तुमचं राजपत्र मिळवता येणार आहे.

पूर्वी नाव बदलण्याची प्रक्रिया ही किचकट होती, ऑनलाइन राजपत्रामुळे ती अतिशय सोपी व सहज झाली आहे. जुनी  प्रक्रिया वेळखाऊ व पर्यावरणाचा ऱ्हास करणारी होती.

ऑनलाइन पद्धती ही ‘पेपरलेस’ अर्थातच पर्यावरणपूरक असल्याने अधिक सोपी व वेळेची बचत करणारी ठरली आहे. अलीकडे नागपूर, पुणे, औरंगाबाद व मुंबई येथून या कार्यालयाचे काम चालते. या पद्धतीत मनुष्यबळाची बचत झाली आहे.

Advertisement

राजपत्रातमध्ये जन्मतारीख, नाव, धर्म यातील बदल राजपत्रात अधिकृतपणे नोंदविता येतो. विवाहित व नोकरीतील महिला यांच्या नावातील बदल, नावातील काही किरकोळ चुकांची सुधारणा, दत्तविधानातील नाव बदल राजपत्रात नोंदविता येतात. ऑनलाइन अर्ज व शुल्क भरल्यानंतर किमान 15 दिवसांच्या कालावधीत राजपत्रात बदल प्रसिद्ध करण्यात येतो.

यासाठी कोणती कागदपत्रे आवश्‍यक ? 

आवश्‍यक नाव, जन्मतारीख, धर्म बदलासाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. यासाठी आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो, शाळा सोडण्याचेप्रमाणपत्र, लग्नपत्रिका, दत्तकपत्र, जन्मनोंद, नावाच्या दुरुस्तीबाबत कागदपत्रे, नावातील चुकांची दुरुस्ती आदी.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर
Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker