वर्ष 2022 मधिल चार महिने पूर्ण होऊन आपण उद्या मे महिन्यात पदार्पण करणार आहोत. नविन महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वपूर्ण बदल घडून येत असतात.

अशातच मे महिन्यात आता पुन्हा एकदा काही महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. वास्तविक नवीन महिना सुरू झाला की काही ना काही आनंद नक्कीच होतो, कारण प्रत्येकाचा पगार महिन्याच्या सुरुवातीला येतो. तथापि, महिन्याच्या सुरुवातीला अनेक गोष्टी बदलतात, जसे की वस्तूंच्या किमती वाढतात.

आता बघितले तर एप्रिल महिना संपून मे महिना सुरू होणार आहे. मे महिन्याची सुरुवात अनेक बदलांसह होणार आहे. मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल ते आपण जाणून घेऊया.

सलग चार दिवस बँका बंद राहणार तुम्ही अनेकदा बँकेत काम करत असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वास्तविक 1 मे ते 4 मे पर्यंत सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. तथापि, या सुट्ट्या राज्यानुसार बदलतील. ईदचा सण मे महिन्याच्या सुरुवातीलाच असतो. या संपूर्ण महिन्यात शनिवार आणि रविवारसह सुमारे 11 दिवस बँका बंद राहणार आहेत.

सिलिंडरच्या किमती वाढू शकतात: मे महिन्याच्या सुरुवातीला कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतींचा विचार करू शकतात. या महिन्यात घरगुती गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

IPO मध्ये UPI पेमेंट मर्यादा वाढवली जाईल: या महिन्यात इतर बदलांसह आणखी एक मोठा बदल होणार आहे. वास्तविक या महिन्यात रिटेल गुंतवणूकदारांसाठी UPI पेमेंटची मर्यादा वाढवली जाईल. सेबीच्या नवीन नियमांनुसार, 1 मे नंतर एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी UPI द्वारे पेमेंट करताना तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंतची बोली सबमिट करू शकता. सध्या ही मर्यादा दोन लाख रुपये आहे. नवीन मर्यादा 1 मे पासून लागू होणार आहे.