मटण बनवले नाही; पती म्हणाला, “तलाक, तलाक, तलाक’ ! नंतर झाले असे काही…

MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- पतीने पत्नीला जेवणात मटण बनवण्यास सांगितले, मात्र पत्नीने मटण बनवले नाही. या कारणावरून पतीने पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण केली. इतकेच नाही तर आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही, असे सांगून तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे उच्चारून तलाक दिला.

हा प्रकार अमरावती शहरातील नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत ४ ऑगस्टला घडला. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध ५ ऑगस्टला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीच्या जेवणात मटण बनवायचे, असे सांगून पती बाहेर गेला. काही वेळानंतर पती घरी आला व त्या वेळी पत्नीने जेवण तयार असल्याचे सांगितले. पत्नीने जेवणात मटण बनवले नसल्याचे पतीच्या लक्षात आले. त्या कारणावरून पतीने पत्नीसोबत वाद घातला. इतक्यावरच पती थांबला नाही, तर त्याने ३० वर्षीय पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली.

Advertisement

त्यानंतर पतीने पत्नीसमोर तीन वेळा तलाक शब्द उच्चारून तलाक दिल्याचे सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पत्नीने पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीने समजून घेण्याऐवजी पत्नीच्या भावाला मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे अखेर पत्नीने नागपुरी गेट पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker