Multibagger Penny Stock : पेनी स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स आहेत, जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

आज आपण अशाच काही पेनी स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. आज आम्ही अशा काही 10 रुपयांच्या खाली असलेल्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी एका वर्षात 1300 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

या यादीत पहिले नाव राज रेयॉनचे आहे. राज रेयॉनचा शेअर आता 20 पैशांवरून 2.80 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात या शेअरने 1300 रुपयांचा परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे एक लाख 14 लाख रुपये झाले असते. मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या यादीत एमपीएस इन्फोटेक्निक्स देखील आहे.

या शेअरने एका वर्षात 1050 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात हा शेअर 10 पैशांनी वाढून 1.15 रुपये झाला आहे. म्हणजेच एका वर्षात एक लाख रुपये 11 लाख 50000 झाले आहेत.

तिसरा स्टॉक आहे अंकित मेटल अँड पॉवर, ज्याने गेल्या वर्षभरात 763 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ 90 पैसे होती. बुधवारी तो 8.20 रुपयांवर बंद झाला