Multibagger Penny Stock : मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

मात्र काही तोटा देखील करतात.आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत, ज्याने भरपूर फायदा करुन दिला आहे. वास्तविक जर तुम्ही या वर्षीचा मल्टीबॅगर पेनी स्टॉक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

आज आम्ही तुम्हाला मल्टीबॅगर पेनी स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने आतापर्यंत 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात 5 रुपयांपेक्षा कमी असलेल्या दोन शेअर्सनी एवढी जोरदार झेप घेतली की त्यांनी थेट 9 रुपयांचा टप्पा पार केला.

आम्ही बोलत आहोत जेनिथ बिर्ला आणि राज रेयॉनबद्दल या दोन शेअर्सनी एका महिन्यात अनुक्रमे 163.77 टक्के आणि 116.47 टक्के बंपर परतावा दिला आहे.

जेनिथ बिर्ला स्टॉक ऑफ द मंथ : मल्टीबॅगर पेनी स्टॉक निफ्टी स्मॉलकॅप 100 च्या तुलनेत जेनिथ बिर्ला स्टॉकने 1554.55% चा 3 वर्षाचा परतावा दिला ( ज्याने 40.62% परतावा दिला). दुसरीकडे, निफ्टी मेटल स्टॉकने 3 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 83.86% परतावा दिला, तर जेनिथ बिर्लाने 1554.55% परतावा दिला.

एका आठवड्याची कामगिरी पाहिली तर या शेअरने 25.52 टक्के परतावा दिला आहे. तर 3 महिन्यांत 727.27 टक्के आणि एका वर्षात 770 टक्के. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 9.10 आणि निम्न 80 पैसे आहे.

राज रेयॉन एका महिन्यात 116.47 टक्क्यांनी वाढला : जर आपण टेक्सटाईल सेक्टरच्या स्टॉक राज रेयॉनबद्दल बोललो तर हा स्टॉक एका आठवड्यात 8.88 टक्क्यांनी वाढला आहे.

तर अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. त्यात एका महिन्यात 116.47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षाच्या कामगिरीवर नजर टाकली तर राज रेयॉनने 3580 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

अशा प्रकारे 1 कोटी 84 लाख झाले: 3 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर एक लाख रुपये सुमारे 2 कोटी झाले आहेत. शेअरने 3 वर्षात 18300 टक्के उसळी घेतली आहे. 1 जून 2018 रोजी त्याचे मूल्य केवळ 25 पैसे होते. NSE वर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु9.20 आहे आणि कमी रु 1.35 आहे.