Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी भारतात नव्हे तर जगभरात आपला डंका वाजवत आहेत. मेहनतीच्या जोरावर त्यांनी आजघडीला इतके साम्राज्य उभारले आहे.

2002 मध्ये जेव्हा वडिल धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी आपले दोन्ही पुत्र मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना आपल्या संपत्तीत एकसमान वाटा दिला होता, परंतु आज त्यांचा धाकटा मुलगा अनिल अंबानी अपयशाच्या मार्गावर आहे, तर मोठा मुलगा मुकेश अंबानी हे मात्र सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

दरम्यान आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स जिओच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे. आता ही जबाबदारी त्यांचा मुलगा आकाश अंबानी सांभाळणार आहे.

कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की 27 जून रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या बोर्डाने गैर-कार्यकारी संचालक आकाश अंबानी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

मुकेश अंबानी यांचा कार्यकाळ 27 जून रोजी संपल्यानंतर आकाश अंबानी यांची नियुक्ती प्रभावी झाली आहे. याशिवाय पंकज मोहन पवार यांना पाच वर्षांसाठी कंपनीचे एमडी आणि रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांना स्वतंत्र संचालक करण्यात आले आहे.

आकाश अंबानी आधीच जिओमध्ये मोठ्या भूमिकेत आहे :- आकाश अंबानी हे आधीपासून रिलायन्स जिओमध्ये संचालक म्हणून काम करत होते आणि आता त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आकाश अंबानी आणि त्याची जुळी बहीण ईशा अंबानी यांनी गेल्या काही वर्षांपासून कंपनीला पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे. 2020 मध्ये, रिलायन्सने अनेक कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित केली होती,

ज्या अंतर्गत Google, Facebook, General Atlantic आणि सौदी अरेबियाच्या Sovereign Public Investment Fund (PIF) ने रिलायन्सच्या रिटेल आणि डिजिटल युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि त्यासाठी आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांनी कठोर परिश्रम घेतले.

मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षीच संकेत दिले होते :- आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षीच २०२१ मध्ये नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स फॅमिली डे साजरा केला जातो.

गेल्या वर्षी या प्रसंगी मुकेश अंबानी यांनी स्वतःसह सर्व वरिष्ठांना रिलायन्समध्ये तरुण प्रतिभा जोपासण्याची वचनबद्धता सांगितली होती, म्हणजेच रिलायन्समध्ये तरुणांना प्रगत करण्याचे काम केले जाईल आणि त्यांना जबाबदारी दिली जाईल.