मुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाला मोठा दणका; दिलाय ‘हा’ निर्णय

MHLive24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- रिलायन्स-फ्यूचर समूह यांच्यादरम्यानच्या बहुचर्चित सौद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. हा निकाल अमेझॉनच्या बाजूने आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे रिलायन्स-फ्यूचर यांच्यातील सुमारे 24 हजार कोटी रुपयांच्या ‘डील’वर स्थगिती आली आहे.

या कराराची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. सर्वोच्च न्यायालयाने अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. सीएनबीसी टीव्ही 18 च्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की Emergency Arbitrator निर्णय लागू करण्यायोग्य आहे. Emergency Arbitrator ने फ्युचर रिटेल डीलवर स्थगिती आदेश जारी केला होता.

हा निकाल आल्यावर रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.79 टक्के (38.30 रुपये) घसरून 2095.95 रुपयांच्या पातळीवर आला. रिलायन्सच्या घसरणीमुळे बाजारातही घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 157 अंकांच्या घसरणीसह 54335 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि निफ्टी 22 अंकांनी 16272 च्या पातळीवर घसरला होता. सेन्सेक्समध्ये सध्या रिलायन्सला मोठा तोटा सहन करावा लागतोय.

Advertisement

फ्युचर रिटेलने आपला संपूर्ण व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकला होता :- प्रसिद्ध फ्यूचर समूहाचे भारतातील काही किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील मालकी हक्क रिलायन्स समूहाने विकत घेतले होते. तब्बल २४ हजार ७१३ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर समूहात झालेल्या या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने विरोध केला होता.

फ्यूचर समूहाच्या कंपनीत अमेझॉनची ४९ टक्के मालकी आहे. त्यामुळे या व्यवहारानुसार जर कंपनी विकली जाते, त्यावेळी ती खरेदी करण्याचा अधिकार सर्वात आधी अमेझॉनचा ठरतो. पण, रिलायन्स-फ्यूचर करारात याचं पालन केलं गेलं नाही, असं अमेझॉननं म्हटलं होतं.

रिलायन्स रिटेलसोबत फ्युचर रिटेलचा 3.4 बिलियनचा करार Emergency Arbitrator निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पात्र आहे, असंही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेय. Arbitrator या करारावर स्थगिती आदेश जारी केला होता, ज्या अंतर्गत फ्युचर रिटेलने आपला संपूर्ण व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकला होता. अॅमेझॉनने रिलायन्स आणि फ्युचर कराराला विरोध केला होता आणि त्यावर स्थगितीची विनंती केली होती.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker