अकरावी प्रवेश परीक्षेसाठी सहा लाखांहून अधिक नोंदणी

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.

राज्यातील जवळपास सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत ‘सीईटी’ परीक्षेसाठी नोंदणी केली, तर सीबीएसई आयसीएसई यांसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी दोन तारखेपर्यंत मुदत आहे.

विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ऐच्छिक :- कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असून, ती ऑफलाइन स्वरूप असेल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

Advertisement

राज्य मंडळाने यापूर्वी २० जुलै रोजी अकरावी सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे २१ जुलैला ही अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांनी अर्ज नोंदणीसाठी नव्याने संकेतस्थळ विकसित करण्यात आले. त्यानुसार राज्य मंडळाने जाहीर केलेल्या नव्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

नव्याने अर्ज कोणाला करावा लागणार ? :- यापूर्वी २० आणि २१ जुलै दरम्यान परीक्षेसाठी नोंदणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून, या संकेतस्थळावर अर्ज पाहता येईल. या वेळी अर्ज पूर्णपणे सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही; मात्र यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

परीक्षा शुल्क नाही :- यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, “राज्य मंडळाच्या २०२१ च्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘सीईटी’ परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही; मात्र राज्य मंडळाची २०२१ पूर्वी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई आणि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker