RFT or FTO status of account: खात्यात येणार आहेत पैसे ! पण तुमच्या खात्यात ‘RFT’ किंवा ‘FTO’ स्टेटस दाखवतय का? जाणून घ्या काय आहे याचा अर्थ

MHLive24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 10 वा हप्ता लवकरच येणार आहे. कृषी मंत्रालय 15 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते.(RFT or FTO status of account)

अशा परिस्थितीत तुमच्या खात्यात पैसे येत आहेत की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येथे नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही सहजपणे तुमचा स्टेट्स तपासू शकता.

तुमच्या खात्यात हा स्टेटस दिसत आहे का?

Advertisement

जर तुमच्या स्टेटसमध्ये ‘FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग आहे’ असे लिहिले जात असेल, तर याचा अर्थ सरकारने तुमच्याद्वारे दिलेली माहिती कंफर्म केली आहे. म्हणजेच आता लवकरच पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील.

जर तुमच्या स्टेटसवर असे काही लिहिलेले असेल तर ?

जर तुमच्या स्टेटसमध्ये ‘Rft Signed by State Government’ असे लिहिले जात असेल तर त्याचा अर्थ ‘रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर’ असा होतो. म्हणजेच तुम्ही दिलेली माहिती तपासली आहे.

Advertisement

आता ते पुढीलकामासाठी हस्तांतरित करण्यात आले आहे. थोड्या उशिराने का असेना पण 10वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच येईल.

पैसे कसे ट्रांसफर केले जातात ?

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
यानंतर, राज्य सरकार त्या अर्जावर तुमचा महसूल रेकॉर्ड, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक वेरिफिकेशन करते.
जोपर्यंत राज्य सरकार तुमच्या खात्याची पडताळणी करत नाही, तोपर्यंत पैसे येत नाहीत.
राज्य सरकारने खात्याची पडताळणी करताच, तुमचा एफटीओ तयार होईल.
म्हणजेच, यानंतर तुमचा अर्ज स्वीकार्य होईल.
त्यानंतर केंद्र सरकार खात्यात पैसे ट्रान्सफर करते.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker