महाराष्ट्राला मदतीचं मोदींचं आश्वासन

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. कोकणापासून वर्धा-अकोल्यापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले.

कोकणाला मदत करणार :-  कोकणात पुरानं थैमान घातलं आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झाले आहेत. या मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. कोकणाला मदत करण्याचं आश्वासन दिलं. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळपासूनच राज्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मोदी यांचे मराठीत ट्वीट :- मोदी यांनी या चर्चेची माहिती मराठीत ट्वीट करून दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे.”

Advertisement

दरेकरांचा भर पावसात आढावा :- दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भर पावसात महाड, माणगाव परिसरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहचले. तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर ते, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडले आहेत. दरेकर म्हणाले, “तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी गावात 25 ते 30 घरं दरड कोसळून त्याखाली आल्याची माहिती दिली. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही.”

मुंबईतून मदत पाठविणार :- “आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरलं नाही, तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत,” अशी माहिती दरेकर यांनी दिली

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker