मोदी सरकारची जबरदस्त योजना; बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज अन अनुदान, जाणून घ्या

MHLive24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  अनेकांना कोणता ना कोणता उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आवड असतेच. परंतु नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येतात. बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारही असे योजना आणते पण त्याची पुरेशी माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. योजना पोहोचल्या तरी त्याची पुर्तत: करण्यासाठी नाकी नऊ येतात.

त्यामुळे तरुण उद्योगांकडे येत नाहीत. अशीच एक तरुणांना मदत करणारी सरकारची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान रोजगार सृजन योजना. या योजनेचा लाभ घेतला तर अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. जाणून घेऊयात या योजनेबद्दल.

कोणाला कर्ज मिळेल ? :- वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज मिळू शकते.

Advertisement

मात्र, तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे नवा असला पाहिजे, ही पूर्वअट आहे. तुम्ही अगोदरपासूनच एखादा व्यवसाय करत असाल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतून कर्ज मिळणार नाही. तसेच पूर्वीपासून सरकारी अनुदांनाचा लाभार्थी असलेल्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

किती अनुदान मिळणार ? :- पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतंर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 टक्के अनुदान मिळेल. तर शहरी भागातील तरुणांना 15 टक्के अनुदान मिळेल. व्यवसायात 10 टक्के पैसे तुमचे असणे गरजेचे आहे.

योजनेचा लाभ कसा मिळवाल ? :- पंतप्रधान रोजगार सृजन योजनेचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेच्या PMEGP संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी PMEGP हा पर्याय निवडावा. त्यानंतर PMEGP E -Portal हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन Online Application Form of Individual मिळवता येईल. या अर्जात तुम्हाला सर्व तपशील भरावा लागेल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker