मोबाईलमध्ये इंटरनेट आहे? मग कमवा पैसेच पैसे

MHLive24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- असं म्हटलं जातं की खूप पैसे कमवायचे असतील तर नोकरी सोडून व्यवसाय केला पाहिजे. तसा जमाना पण तर स्टार्टअपचा आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीपासून कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही आयडीया देणार आहोत त्याने आजची तरूण पिढी लाखो रुपये कमवू शकते.

सध्या जमाना आहे इंटरनेटचा, यात अश्या अनेक वेबसाइट्स आहेत ज्या ऑनलाइन जाहिरातीवर क्लिक करून तुम्ही हजारोंची कमाई करू शकता. होय अशा वेबसाइट्स आहेत ज्या जाहिरातींवर क्लिक करण्यासाठी पैसे देतात. यासह अशा अनेक आयडिया आहेत ज्या आम्ही येथे तुमच्यासाठी देणार आहोत

1. क्लिक्ससेन्स :- जाहिरातींमधून पैसे कमवण्यासाठी हे चांगलं संकेतस्थळ आहे. अनेक लोकं या संकेतस्थळावरून 15 हजार रुपये दर महिन्याला कमावतायत. या साइटवरून तुम्ही तुमच्या PayTM किंवा PayPal च्या माध्यमातून पैसे काढू शकतात. वय, लिंग आणि लोकेशन या बेसिसवर तुम्हाला जाहिराती दिसतात.

Advertisement

2. सोशल पोस्टला प्रमोट करा :- तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.

3. Video पाहून कमवा पैसे :- जर तुम्हाला टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घेणं गरजेचं आहे.

4. नवीन अॅप्स डाऊनलोड करा :- असे अनेक नवीन अॅप आहेत. जे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाईडजॉय, Sweatcoin, इबोटा असे अनेक अॅप आहेत.

Advertisement

5. गेम खेळून कमवा पैसे :- काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लक्टीस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker