आमदार साळवी म्हणतात, ‘तुझं थोडाड फोडील, तुला गाडील!’

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी, ‘वेळ आली तर शिवसेना भवन फोडू,’ असं चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी, सेना नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर लाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत कोलांटउडी मारली.

राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी लाड यांचा चांगलाच समाचार घेतला. तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, अशा शब्दांत साळवी यांनी लाड यांना प्रत्युत्तर दिलं.

शिवसेनेच्या मतांवरच आमदार झालास :- “आधी आमदारकीचा राजीनामा दे. कारण शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार झाला. जर हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला समोर जा. मग बघ, शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील,” असे एकेरीवर येत साळवी यांनी लाड यांना ठणकावले.

Advertisement

दिवाळखोरीचं उत्तर निवडणुकीत :- शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भुईसपाट करून देईल, असा हल्ला चढवत बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे, असं उदय सामंत म्हणाले.

नेमका काय प्रकार घडला ? :- भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्‌घाटन आमदार नीतेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. लाड यांनी या वेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लाड यांच्यावर सेना-नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा लाड यांनी केला.

लाड यांची कोलांटउडी ! :- प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करण्यात आला. मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या; परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो, की भिण्याचं कुठलंही कारण नाही.

Advertisement

जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल; परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो, तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवनाद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker