आमदार राणे यांचा शिवसेनेवर पलटवारः ही घ्या बाटग्यांची यादी

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. लाड यांना उत्तर देताना आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपमध्ये मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे, अशी जहरी टीका केली आहे. यावर भाजप आमदार नीतेश राणे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

सामन्यातील टीकेला प्रत्युत्तर :- भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते; पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे.

त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी टीका शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. राणेंनी सलग काही ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Advertisement

बाटग्यांच्या महामंडळाची यादी मोठी :- ‘शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळाची यादी तशी लांब आहे; पण थोडी माहितीसाठी. सचिन आहीर- बीकेसीची जबाबदारी, राहुल कनाल- शिर्डी संस्था, आदेश बांदेकर- सिद्धीविनायक संस्था, उदय सामंत- कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार- मंत्री, प्रियंका चतुर्वेदी- खासदार अशी यादी राणे यांनी जाहीर केली आहे. त्याचबरोबर आणखी एक ट्वीट करत, डाके, रावते, रामदास कदम, शिवतारे, राजन साळवी, सुनील शिंदे सारखे जुने शिवसैनिक दिसणार नाहीत,’ असा टोला राणे यांनी लगावला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker