आमदार लांडगे यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मै हू डॉन’ या गाण्यावर लांडगे यांनी केलेल्या डान्सचा जुना व्हिडिओ पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. मैत्री दिनाचं औचित्य साधत समर्थकांनी लांडगे यांनी राजकारणातील मित्रांसोबत केलेल्या डान्सचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत डान्स :- जगभरात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने महेश लांडगे यांनी मित्रांसोबत केलेल्या डान्सचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी चिंचवडमधील माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी या डान्समध्ये लांडगे यांना साथ दिली होती.

मै हू डॉन, बडे मियां छोटे मियां यासारख्या गाण्यांवर त्यांनी ग्रुप डान्स केला. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेलं नाही; मात्र जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Advertisement

कोण आहेत महेश लांडगे ? :- आदार महेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधी आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला. राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख आहे.

भंडारा उधळत आमदार लांडगेंचा डान्स :-  याआधीही, आमदार महेश लांडगे यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता. महेश लांडगे यांची कन्या साक्षी लांडगे हिचे सहा जून रोजी लग्न झाले. लग्नातील मांडव डहाळे कार्यक्रमाच्या वेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले होते. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगे यांनी नृत्याचा आनंद लुटला होता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker