Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.
जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच जेके लक्ष्मी सिमेंटच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 100% लाभांशाची शिफारस केली आहे.
लाभांशाशी संबंधित या घोषणेनंतर, जेके लक्ष्मी सिमेंटच्या शेअर्सनी गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारादरम्यान 14 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. व्यवहाराच्या शेवटी, जेके लक्ष्मी सिमेंटचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 7.20 टक्क्यांच्या वाढीसह 422.15 रुपयांवर बंद झाला.
कंपनी प्रति शेअर 5 रुपये लाभांश देईल, ;- कंपनीच्या बोर्डाने 18 मे 2022 रोजी 100% लाभांशाची शिफारस केली आहे. म्हणजेच, JK लक्ष्मी सिमेंट 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति शेअर 5 रुपये लाभांश देईल.
जेके लक्ष्मी सिमेंट लिमिटेडचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 27 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षभरात सुमारे 10 टक्क्यांनी घसरले आहेत.
कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 368.65 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची उच्च पातळी 815.25 रुपये आहे.
कंपनीचे शेअर्स 6 ते 400 रुपयांच्या वर गेले, :- जेके लक्ष्मी सिमेंटचे शेअर्स 24 मे 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 5.81 रुपयांच्या पातळीवर होते.
कंपनीचे शेअर्स 19 मे 2022 रोजी BSE वर 422.15 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 24 मे 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्या हे पैसे 72.50 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते.