Share Market :सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.
जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. वास्तविक प्रथम कोरोना आणि नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे यावेळी जगभरातील शेअर बाजारात अस्थिरता स्पष्टपणे दिसून येते.
मात्र या कठीण काळातही अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये स्पष्ट वाढ झाली आहे. अशा कंपन्यांवर एक नजर टाकू ज्यांनी भरघोस परतावा दिला आहे.
SEL मॅन्युफॅक्चरिंग: या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना 2476% पर्यंत परतावा दिला आहे. 27 मे 2022 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 970.10 रुपये होती. 31 डिसेंबर 2021 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 37.65 रुपये होती.
या स्टॉकनीही चमत्कार केला :- या वर्षी मजबूत परतावा देणार्या इतर काही शेअर्स बद्दल बोलल्यास, कैसर कॉर्पोरेशन (2245%), हेमांग रिसोर्सेस (1,102%), गॅलॉप्स एंटरप्रायझेस (1098%), अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स (1057%) यांनी परतावा दिला आहे.
या शेअर्सनी 350% ते 680% पर्यंत परतावा दिला :- कटारे स्पिनिंग मिल्स, शांती एज्युकेशनल, सीडब्ल्यूडी, डिलिजंट इंडस्ट्रीज, सुंदर, धनलक्ष्मी फॅब्रिक्स यांनी या कालावधीत 350 ते 680% पर्यंत परतावा दिला आहे.