Rakesh JhunJhunwala Portfolio :बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.
त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. वास्तविक झुनझुनवाला स्वतःच्या आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावे शेअर्समध्ये पैसे गुंतवतात.
ट्रेंडलाइनवर दिलेल्या माहितीनुसार, झुनझुनवाला अँड असोसिएट्सच्या पोर्टफोलिओमध्ये 34 स्टॉक्स आहेत, ज्यांचे एकूण मूल्य सुमारे 32 हजार कोटी रुपये आहे. सामान्य गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवून असतात,
त्यांनी कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि कोणत्या कंपनीची विक्री केली. येथे अशा कंपन्यांची माहिती आहे ज्यांचे शेअरहोल्डिंग पॅटर्न मार्च 2022 तिमाहीसाठी उपलब्ध आहे आणि झुनझुनवाला यांनी मार्च 2022 तिमाहीत हिस्सा वाढवला नाही किंवा कमी केला नाही.