मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. वास्तविक या वर्षी जर आपण मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या स्टॉकबद्दल बोललो तर अदानी ग्रीन एनर्जीचे नाव अग्रस्थानी येईल.

या कंपनीने आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा देऊन श्रीमत केले आहे. अदानी समूहाच्या इतर शेअर्सप्रमाणे, अदानी ग्रीन एनर्जीचे पी/ई खूप उच्च आहे. त्याचे P/E 1076 आणि मार्केट कॅप 4.48 लाख कोटी रुपये आहे.

गेल्या तीन वर्षात अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 43 रुपयांवरून 2910 रुपयांपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच अदानी ग्रीनच्या शेअर्सनी या तीन वर्षात 6600% परतावा दिला आहे.

आज अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स कालच्या बंद किंमतीपासून 66 रुपयाच्या वर उघडले आणि बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच ते 2910 रुपयांवर पोहोचले.

शेअर किमतीचा इतिहास कसा आहे ? गेल्या एका महिन्यात अदानी समूहाचा हा मल्टीबॅगर शेअर 1930 रुपयांवरून 2910 रुपयांपर्यंत वाढला आहे.

या कालावधीत कंपनीने 50% परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 1345 रुपयांवरून 2910 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

म्हणजेच 2022 च्या केवळ 4 महिन्यांत 115% परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्याची वाटचाल पाहता मल्टीबॅगरचे शेअर्स 1147 रुपयावरून 2910 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जीने या कालावधीत 150% परतावा दिला आहे. तर गेल्या एका वर्षात या शेअरने 170% परतावा दिला आहे आणि तो 1055 रुपयांवरून 2910 रुपयांपर्यंत वाढला आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या तीन वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला आहे. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 26 एप्रिल 2019 रोजी 43 रुपयांवर बंद झाला.

आज ते 2910 रुपयांवर व्यवहार करत आहेत. म्हणजेच तीन वर्षांत त्यात 66 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमची रक्कम 67 लाख रुपये झाली असती.

त्याचप्रमाणे वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ती 2.70 लाख रुपयांवर पोहोचली असती.