Government Scheme : सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.
अशातच सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहित केले जाते.
या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे शाश्वत मॉडेल विकसित केले जाईल.
क्लस्टर बिल्डिंग, क्षमता निर्माण, प्रोत्साहन, मूल्यवर्धन आणि विपणन यासाठी या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. रासायनिक मुक्त सेंद्रिय शेतीला क्लस्टर पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली होती.
परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर 50000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये 3 वर्षांसाठी सेंद्रिय खत, कीटकनाशके, बियाणे इत्यादी सेंद्रिय साहित्य खरेदीसाठी प्रति हेक्टर 31000 रुपये दिले जातात.
याशिवाय 3 वर्षांसाठी मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रति हेक्टर 8800 रुपये दिले जातात. परंपरेगत कृषी विकास योजना 2022 अंतर्गत गेल्या 4 वर्षात 1197 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच क्लस्टर निर्मिती आणि क्षमता वाढीसाठी 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर 3000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.