MG Motar Electric Vehicle
MG Motar Electric Vehicle

MHLive24 टीम, 07 मार्च 2022 :- MG Motar Electric Vehicle : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors आणि Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. दरम्यान नामांकित कंपनी MG Motors आकर्षित EV वाहने लाँच करत आहे.

MG Motor India ने अधिकृतपणे भारतात 2022 MG ZS EV लाँच केली आहे. ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 21.99 लाख रुपये आहे. ही किंमत इलेक्ट्रिक SUV च्या बेस एक्साईट प्रकारासाठी आहे जी जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल, तर आतापासून उपलब्ध केलेल्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये आहे.

ही इलेक्ट्रिक कार भारतात पहिल्यांदा 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, जी आता कंपनीने मोठ्या बदलांसह बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बाह्य आणि आतील भागात बरेच बदल करण्यात आले आहेत.

सर्वत्र एलईडी दिवे दिले आहेत

2022 MG ZS EV ला एक फेसलिफ्ट देण्यात आली आहे जी नवीन ग्रिलसह येते, ज्यामुळे ते खूपच स्टाइलिश बनते. इलेक्ट्रिक एसयूव्हीला 17-इंचाचे टॉमाहॉक हब डिझाइन अलॉय व्हील देण्यात आले आहेत, याशिवाय कारला सर्वत्र एलईडी दिवे देण्यात आले आहेत.

प्रीमियम लेदरने झाकलेला डॅशबोर्ड

SUV ला प्रीमियम लेदर कव्हर डॅशबोर्ड, ड्युअल-पेन पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर सेंटर हेडरेस्ट, कप होल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट आणि मागील एसी व्हेंट्स मिळतात. केबिनमध्ये 10.1-इंचाची एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. कंपनीने 7-इंचाचा एलईडी ड्रायव्हर्स डिस्प्ले, 5 यूएसबी पोर्ट, वायरलेस फोन चार्जिंग, एअर फिल्टर, डिजिटल ब्लूटूथ की सारखे अनेक फीचर्स दिले आहेत.

सिंगल चार्जमध्ये 461 KM रेंज

MG India ने या इलेक्ट्रिक SUV ला 50.3 kW-R बॅटरी पॅक दिला आहे जो IP69 वॉटरप्रूफ रेटिंग आहे. SUV आता एका चार्जवर 461 किमी प्रवास करते आणि 176 PS पॉवर बनवते, 0-100 किमी/ताशी वेग घेण्यासाठी फक्त 8.5 सेकंद लागतात.

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही इलेक्ट्रिक एसयूव्ही मजबूत आहे, ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, iSmart कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय लेन चेंज असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, 360-डिग्री कॅमेरा, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांचा समावेश आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit