कर्जबाजारीपणामुळे व्यवस्थापकाचा बँकेवर दीड कोटींचा दरोडा

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :- विरारमध्ये बँकेच्या माजी व्यवस्थापकाने बॅंकेतील कर्मचाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला केला. रोपीने बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपी एक कोटी 38 लाखांची रोख आणि सोनं घेवून फरार होण्याच्या प्रयत्नात होता; मात्र नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आले आहे. आरोपीने कर्जबाजारीपणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.

सहायक व्यवस्थापकाचा मृत्यू, तर कॅशियर जखमी :- संबंधित घटना ही विरार पूर्वेतील स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय बँकेत घडली. बँक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून बँकेचा माजी व्यवस्थापक आहे. या हल्ल्यात बॅंकेच्या सहायक व्यवस्थापक असलेल्या महिलेचा मृत्यू झाला, तर कॅशियर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेच्या वेळी बॅंकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमके काय घडले ? :- आयसीआयसीआय बॅंकेच्या विरार पूर्वे शाखेत सहायक व्यवस्थापक योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशिरापर्यंत बॅंकेतच काम करत होत्या. बॅंकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला.

Advertisement

त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले. घटनेचं गांभीर्य ओळखून श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. त्यामुळे बाहेरचे नागरिक सतर्क झाले; मात्र तोपर्यंत दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली.

जखमी अवस्थेत श्रद्धाने प्रतिकार केला; पण आरोपीसमोर तिची ताकद कमी पडल्याने त्याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.

बँकेत सुरक्षा रक्षकच नाही :- बँकेतील आरडाओरडा पाहून बाजूलाच असणाऱ्या काही जिगरबाज तरुणांनी आरोपीला बॅगेसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित घटनेनंतर मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सुरक्षा रक्षक जर बँकेसमोर असते तर एवढी मोठी घटना घडली नसती. महिलेचा जीव गेला नसता. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Advertisement

महिलेच्या नातेवाइकांचे बँकेवर आरोप :- दरम्यान, श्रध्दा आणि योगिताच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या सुमारास बॅंकेत सुरक्षारक्षक का नव्हता? असा प्रश्न विचारला आहे. तसेच जर सुरक्षारक्षक असता तर नक्कीच ही घटना घडली नसती, असं म्हणत यात बॅंकेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप महिलांच्या नातेवाइकांनी केला आहे. योगिताचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तीन वर्षांचा एक मुलगा आहे. तर त्यांचे पती हे फार्मा कंपनीत काम करतात. जखमी श्रद्धा यांनाही पाच वर्षांचा मुलगा आहे.

आरोपी अॅक्सिस बँकेत व्यवस्थापक :- आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगाव येथे अॅक्सिस बॅंकेचा व्यवस्थापक आहे. आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचळल्याचं पोलिसांनी सांगितलं. विरार पोलिसांनी आज वसई न्यायालयात अनिल दुबेला हजर केलं. वसई न्यायलयाने आरोपीला सहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker