तळीये गावासाठी माळीणकरांचा मदतीचा हात

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- दरड कोसळल्याने तळीये गाव उद्ध्वस्त झाले. असाच अनुभव सात वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण गावाला आला होता. दरड कोसळल्याने कोणत्या संकटातून जावे लागते, याची जाण असलेल्या माळीण गावाने तसाच प्रसंग घडलेल्या तळीये गावासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी का होईना मदत पाठविली आहे.

तळीयेमुळे माळीणच्या आठवणी जाग्या :- महाड तालुक्यातील तळीये दरड कोसळल्यानं उद्ध्वस्त झालं. ही दुर्घटना पाहून 2014 सालच्या माळीणची अनेकांना आठवण झाली. तळीये गावात ढिगाऱ्याखालून तब्बल 53 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं; मात्र अद्यापही 32 नागरिक बेपत्ता आहेl. पाच दिवसानंतर अखेर आज तळीयेतील बचावकार्य थांबवण्यात आलं आहे.

बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी 25 हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.

Advertisement

काय झाले होते माळीणमध्ये ? :- आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात 30 जुलै 2014 मध्ये असाच एक डोंगर काळ बनून कोसळला होता. रात्री झोपलेलं संपूर्ण गाव सकाळी नाहीसं झालं होतं. डोंगराचा कडा कोसळून 44 घरं गाडली गेली होती. 151 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या 6 वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत.

माळीण गावातील नागरिकांनी तळीये गावातील ग्रामस्थांना तुमचं दुःख आम्ही जाणतो, असं सांगत तळीये ग्रामस्थांच्या मदतीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे 25 हजारांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

तळीयेतील बचावकार्य थांबवलं :- गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती.

Advertisement

आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं; मात्र त्यानंतर दोन तासांनी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही; मात्र जे लोक बेपत्ता आहेत.

त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, त्याशिवाय आम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

अजूनही 32 नागरिक बेपत्ता :- पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले; मात्र अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत.

Advertisement

डोंगराच्या दरडीबरोबर दोन ते चार किलोमीटरपर्यंत हे नागरिक घरंगळत गेले असावेत असं सांगितलं जातं. त्यामुळे या संपूर्ण दोनचार किलोमीटरच्या परिसरातही शोधाशोध करण्यात आली. या वेळी पाऊस जास्त असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत होता. सर्वत्र चिखल झाल्याने त्यातून मार्ग काढत जाणंही कठीण होत होतं.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker