MakeTV a smart TV : तुमच्या डब्बा टीव्हीला बनवा स्मार्ट टीव्ही; वापरा ‘ही’ ट्रिक्स अन मोठ्या स्क्रीनवर घ्या मोबाईलचा आनंद

MHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आजची दुनिया हि स्मार्ट आहे. त्यामुळे मनोरंजनाची साधनेही स्मार्ट झाली आहेत. त्यात आता OTT प्लॅटफॉर्मच्या एन्ट्रीने मनोरंजनाची दुनियाच बदलली आहे. आज प्रत्येकजण त्यांच्या स्मार्टफोनवर ह्या अॅप्सचा वापर करत असतो.(MakeTV a smart TV)

परंतु बऱ्याचदा असे घडते की तुम्हाला स्मार्टफोनच्या छोट्या स्क्रीनऐवजी तुमच्या टीव्हीवर सदर कंटेंट पाहायचा असतो. याअनुषंगाने अनेक ‘स्मार्ट टीव्ही’ बाजारात आले आहेत.

परंतु जरी तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही नसेल, तरीही तुम्ही टीव्हीवर नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. कसे ते जाणून घेऊया..

Advertisement

सामान्य टीव्हीला बनवा ‘स्मार्ट’

तुमच्या घरात स्मार्ट टीव्ही नसेल पण तुम्हाला Netflix आणि Amazon Prime Video सारखे प्लॅटफॉर्म मोठ्या स्क्रीनवर वापरायचे असतील, तर तुम्हाला एक ट्रेक वापरावी लागेल. यासाठी तुम्हाला फक्त iOS किंवा Android असणाऱ्या स्मार्टफोनची गरज आहे. तुमच्या स्मार्टफोनद्वारे तुम्ही सहजपणे टीव्हीशी कनेक्ट होऊ शकता आणि टीव्हीवर स्मार्टफोन अॅप्स वापरू शकता.

या पद्धतीचा अवलंब करा

Advertisement

तुमचा स्मार्टफोन आणि टीव्ही कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम HDMI अडॅप्टरची आवश्यकता असेल, जो तुम्ही कोणत्याही जवळच्या दुकानातून किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता. फोनला टीव्हीशी जोडण्यासाठी, तुम्हाला एचडीएमआय अॅडॉप्टरची मदत घ्यावी लागेल जो स्मार्टफोनमधून एचडीएमआय आउटपुट करू शकेल.

अॅडॉप्टरसह, तुम्हाला HDMI केबलची देखील आवश्यकता असेल. बहुतेक टीव्ही HDMI पोर्टसह येतात. या प्रकरणात, तुम्हाला फक्त फोन आणि टीव्हीला मिनी HDMI किंवा HDMI अॅडॉप्टरच्या मदतीने कनेक्ट करायचे आहे, जे तुम्हाला फोनला टीव्हीवर मिरर करण्याची परवानगी देईल.

टीव्हीवर आरामात चालवा Netflix आणि हे सर्व

Advertisement

एकदा तुम्ही तुमचा टीव्ही तुमच्या स्मार्टफोनशी HDMI किंवा USB केबलच्या मदतीने कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही टीव्हीवर हवे ते पाहू शकता. मिररिंगचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर जे काही चालवता ते तुमच्या टीव्हीवर परावर्तित होईल.

अशा प्रकारे, टीव्ही आणि फोन कनेक्ट करून, तुम्ही टीव्हीवर नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारखे OTT प्लॅटफॉर्म प्ले करू शकता तसेच चित्रे आणि व्हिडिओ पाहू शकता.

या जुगाडू पद्धतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला टीव्हीशी कनेक्ट करून स्मार्ट टीव्ही बनवू शकता. तुमचा टीव्ही यास सपोर्ट करत असल्यास, तुम्ही Chromecast सारखे पर्याय वापरून तुमचा फोन वायरलेसपणे टीव्हीशी कनेक्ट करू शकता.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker