Things from animal dung : जनावरांच्या शेणापासून ‘ह्या’ गोष्टी तयार करा; बक्कळ पैसे कमवाल

MHLive24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- ग्रामीण भागामध्ये शेतीच सर्रास केली जाते. त्याच्या जोडीला पशुपालन करणे हा मुख्य व्यवसाय आहेत. शेती आणि पशुसंवर्धन एकमेकांना पूरक आहेत. पशुपालन व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते निरंतर उत्पन्नाचे स्रोत आहे.(Things from animal dung)

सद्यस्थितीत जनावरांपासून मिळणारे दूध व शेणाची उपयुक्तता समजून घेणे आवश्यक आहे आणि विविध पद्धतींनी प्रक्रिया करून आपण त्याचे मूल्य वाढवू शकता.

प्राण्यांपासून मिळणाऱ्या शेणाच्या उपयुक्ततेवर प्राण्यांची जाती, स्थिती आणि पौष्टिक आहारात वापरल्या जाणार्‍या खाद्य पदार्थांचा परिणाम होतो. या शेणापासून आपण अनेक गोष्टी बनवू शकता आणि पैसे कमाऊ शकता

Advertisement

1.वर्मी कम्पोस्ट:- वर्मी कंपोस्ट खनिज घटक आणि मातीच्या जीवाणूंनी समृद्ध एक उत्कृष्ट सेंद्रीय खत आहे. हे गांडुळद्वारा शेणाचे विघटन करुन तयार करतात. गांडुळ खत तयार करण्यासाठी, 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल असणाऱ्या जागेची आवश्यकता आहे. गांडुळ खत 30-40 दिवसात तयार होते. हे शेतीसाठी खूप उपयुक्त आहे.

2.गौ काष्ठ:- पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, शेड व पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेणापासून गौ काष्ठ तयार करता येते. गौ काष्ठचा उपयोग दाह संस्कार, हवन इत्यादीमध्ये वापरू शकता. यामुळे झाडांची तोड कमी होइल आणि पर्यावरण शुद्ध व प्रदूषणमुक्त होईल.

आपण आपल्या शेतात गौ काष्ठ बनवून विक्री करु शकता. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल आणि पशुधन आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. पर्यावरणाचे शुद्धीकरण आणि संरक्षण देखील होऊ शकते.

Advertisement

3. गौऱ्या :- गाय / म्हशीचे शेण हाताने आकार देऊन आणि उन्हात वाळवून हे तयार केले जाते. हे स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून वापरले जाते, विशेषत: ग्रामीण भागात यज्ञ आणि इतर धार्मिक विधी दरम्यान गौऱ्या वापरल्या जातात. ते जाळल्याने वातावरण शुद्ध व पवित्र होते.

4. बायोगॅस :- जगात सर्वात जास्त प्राणी भारतात आहेत, त्यामुळे बायोगॅसच्या विकासाची मोठी शक्यता आहे. बायोगॅस हा ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत, प्राण्यांपासून मिळणारे शेण कमी तापमानात डायजेस्टरमध्ये ठेवू तयार केला जातो.

या वायूमध्ये 75 टक्के मीथेन वायू असतो. शेणातून मिळणारा मिथेन गॅस सीएनजीमध्ये ट्रान्सफर करून उपयोगात आणू शकतो. ग्रामीण भागात, स्वयंपाक करण्यासाठी आणि इंधन म्हणून प्रकाश व्यवस्था करण्यासाठी याचा वापर केला जातो.

Advertisement

5. गौ अगरबत्ती :- शेणापासून घरी धूप काडी बनवून, पशुपालक आपला वेळ योग्य प्रकारे वापरु शकतो आणि गौ अगरबत्ती बनवून आपले उत्पन्नही वाढवू शकतो. यासाठी तुम्ही 4 किलो शेण, 2 किलो लाकूड पावडर, 5 कापूर गोळी आणि 100 ग्रॅम बार्लीचे पीठ घालून अगरबत्ती बनवू शकता.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker