SIM Card Rule: मोबाईल सिम कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल; थेट युजर्सवर होणार परिणाम

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :- मोबाईल ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने आता ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शन मिळवणे अधिक सोपे केले आहे. ग्राहक आता नवीन मोबाईल कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि एवढेच नाही, आता सिम कार्ड त्यांच्या घरी पोहचेल.(SIM Card Rule)

यासाठी, ग्राहक आधार किंवा डिजीलॉकरमध्ये साठवलेल्या कोणत्याही दस्तऐवजासह स्वतः वेरिफाई करू शकतात.

दूरसंचार विभागाने यासाठी आदेश जारी केला आहे. DoT चे हे पाऊल 15 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा भाग आहे.

Advertisement

केवायसी 1 रुपयामध्ये केले जाईल

जारी केलेल्या नवीन आदेशाच्या नियमांनुसार, वापरकर्त्यांना नवीन मोबाईल कनेक्शनसाठी यूआयडीएआयच्या आधार आधारित ई-केवायसी सेवेद्वारे सर्टिफिकेशन साठी फक्त 1 रुपये द्यावे लागतील.

सरकारने कायद्यात सुधारणा केली

Advertisement

प्रीपेडला पोस्टपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी नवीन वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आधारित प्रक्रियेसाठी सरकारने आदेश जारी केला आहे. नवीन मोबाईल कनेक्शन जारी करण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने जुलै 2019 मध्ये भारतीय टेलिग्राफ कायदा, 1885 मध्ये सुधारणा केली होती.

घरी बसून सिमकार्ड मिळवा

आता नवीन नियमानुसार, ग्राहक UIDAI बेस्ड वेरिफिकेशनद्वारे त्यांच्या घरी सिम मिळवू शकतात. दूरसंचार विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे की मोबाईल कनेक्शन ग्राहकांना अॅप/पोर्टल आधारित प्रक्रियेद्वारे दिले जाईल, ज्यामध्ये ग्राहक घरी बसून मोबाइल कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात.

Advertisement

ग्राहकांना सुविधा मिळतील

सध्या, ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शनसाठी किंवा मोबाईल कनेक्शन प्रीपेड ते पोस्टपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी केवायसी प्रक्रियेतून जावे लागते. यासाठी ग्राहकांना त्यांची ओळख आणि पत्ता पडताळणीची कागदपत्रे घेऊन दुकानात जावे लागते.

दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी आणि व्यवसायाच्या सुलभतेसाठी संपर्कविरहित सेवेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker