Mahindra SUV Mahindra's 'this' off-roading SUV in 'that' case again
Mahindra SUV Mahindra's 'this' off-roading SUV in 'that' case again

Mahindra SUV :   महिंद्रा अँड महिंद्र (Mahindra & Mahindra) हे बेस्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) कार्ससाठी देशभरात ओळखले जाते. अलीकडेच, कंपनीने त्याचे नवीन XUV 700, Scorpio-N आणि Scorpio Classic सारखे मॉडेल बाजारात आणले आहेत.

परंतु महिंद्राची मागणी केवळ भारतीय बाजारपेठेपुरती मर्यादित नाही, महिंद्राने परदेशातील बाजारपेठेतही अनेक उत्तम मॉडेल सादर केले आहेत, परदेशात उपलब्ध असलेले महिंद्रा रॉक्सर (Mahindra Roxor) हे मॉडेल आपल्या अनोख्या लुकसाठी आणि ऑफ-रोडिंग गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे.

मात्र पुन्हा एकदा ही SUV कायदेशीर अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. Fiat Chrysler Automobiles (FCA), आता Stellantis चा भाग आहे, Roxor ऑफ-रोडरला (Roxor off-roader) उत्तर अमेरिकन बाजारपेठेत (North American market) विकले जाण्यापासून रोखण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. महिंद्राने ही एसयूव्ही 2018 साली यूएस मार्केटमध्ये लॉन्च केली होती आणि तेव्हापासून तिच्या डिझाईनबाबत वाद सुरू झाला होता.

Fiat Chrysler ने 2019 आणि 2020 मध्ये या SUV च्या डिझाईनवर कायदेशीर लढाई लढली होती, ज्यामध्ये Fiat ने महिंद्रा विरुद्धचा खटला जिंकला होता. परिणामी, महिंद्राला अमेरिकन भूमीवर कार्सच्या विक्रीसाठी आपले वाहन पुन्हा डिझाइन करणे भाग पडले, परंतु आता फियाटला या एसयूव्हीवर संपूर्ण बंदी घालायची आहे.

वाद काय आहे

रॉक्सर बाजारात आल्यापासून FCA त्याची विक्री थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने आरोप केला होता की त्याची डिजाईन जीप एसयूव्ही आणि कंपनीच्या इतर काही मॉडेल्ससारखी आहे. 2019 मध्ये फियाट क्रिस्लर ऑटोमोबाईल्सने दावा केला की महिंद्राने रॉक्सर डिझाइन करण्यासाठी जीप मॉडेल्स आणि घटक कॉपी केल्याचा दावा केला आणि मिशिगनमध्ये आणि यूएस इंटरनॅशनल ट्रेड कमिशन (ITC) समोर खटला दाखल केला तेव्हा या प्रकरणाची सुरुवात झाली.

या प्रकरणी कोर्टात गेल्यानंतर FCA ला विजय मिळाला, परिणामी महिंद्राला आपल्या Roxor SUV चे डिझाईन बदलावे लागले. त्यानंतर महिंद्राने 2020 मध्ये या एसयूव्हीचे डिझाइन दोनदा बदलले, जेणेकरून त्याची यशस्वी विक्री करता येईल.

न्यायालयाने काय म्हटले

डेट्रॉईट फेडरल कोर्टाच्या अंतिम निर्णयाने असे ठरवले की 2020 च्या अखेरीस Roxor SUV मध्ये महिंद्राच्या बदलांमुळे ग्राहकांमध्ये कोणताही गोंधळ होण्याची शक्यता नाही, त्यामुळे कंपनी सुधारित मॉडेलची विक्री करू शकते. त्याच वेळी, न्यायालयाने महिंद्राला 2020 पूर्वी बनवलेल्या एसयूव्ही मॉडेल्सची विक्री करण्यापासून रोखले होते. यूएस जिल्हा न्यायाधीश गेर्शविन ड्रेन यांचा निर्णय आयटीसीच्या निर्णयावर आधारित होता की रोक्सरने फियाट क्रिस्लरच्या ट्रेडमार्क अधिकारांचे उल्लंघन केले नाही कारण ती जीप नाही हे पाहिल्यानंतर सरासरी व्यक्तीला “त्वरीत कळेल”. आता, सहाव्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपीलने निर्णय चुकीची चाचणी मानला आहे.

सहाव्या सर्कीट कोर्टाने असे मत मांडले की, महिंद्रा अँड महिंद्रा आधीच उल्लंघन करणारी असल्याने, न्यायालयाने त्यासाठी कठोर स्टँडर्ड ठरवायला हवे होते. यूएस सर्किट जज हेलन व्हाईट यांच्या तीन न्यायाधीशांच्या पॅनेलच्या युक्तिवादानुसार, महिंद्राच्या नवीन डिझाइनने जीपच्या डिझाइनपासून “Safe Distance” राखले पाहिजे. दुसरीकडे, महिंद्रा या प्रकरणाबद्दल आशावादी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, आम्हाला आशा आहे की या खटल्याचा निकाल कंपनीच्या बाजूने आधीच्या निर्णयांना अनुकूल असेल.