Mahindra Electric Car : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री खूप वेगाने वाढली आहे आणि आता कंपन्यांनी ग्राहकांची ही मागणी समजून घेऊन नवीन वाहने बाजारात आणण्यात रस घेण्यास सुरुवात केली आहे.

भविष्यातील मागणी लक्षात घेऊन मोठ्या वाहन निर्मात्यांसोबत छोट्या स्टार्ट अप्सनी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

महिंद्रानेही आता या शर्यतीत उडी घेतली असून कंपनीने Treo Auto, Treo Delivery Van, Treo Tipper variant आणि e-Alpha Mini Tipper Quad Cycle) सोबत Atom quadricycle लाँच केली आहे.

इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे आणि या शेअरमुळे कंपनी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

महिंद्रा अॅटमची वैशिष्ट्ये: महिंद्रा अॅटम स्वच्छ ऊर्जा, आरामदायी आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी युक्त आहे. Atom सोबत, कंपनीने त्यांचे इलेक्ट्रिक अल्फा टिपर देखील सादर केले आहे जे ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. ई-अल्फा मिनी टिपर 1.5kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे.

जे एका चार्जमध्ये 80 किमी पर्यंतची रेंज देते. यावर तुम्ही 310 किलोपर्यंत वजन उचलू शकता. सध्या महिंद्रा अॅटम हे व्यावसायिक वाहन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. वैयक्तिक वाहन म्हणून लॉन्च करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

परवडणाऱ्या किमतीत लाँच केले जाईल: महिंद्रा अॅटममध्ये ग्राहकांना जबरदस्त लुक आणि फीचर्स दिले जातात. ही एक व्हॅल्यू फॉर मनी कार आहे कारण तिची किंमत खूपच कमी असणे अपेक्षित आहे. रिपोर्टनुसार, याची किंमत 3 लाखांमध्ये लॉन्च केली जाईल. महिंद्रा अॅटम ताशी 50 किमी वेगाने प्रवास करू शकते.

त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर हे वाहन 120 किमी पर्यंतची रेंज देईल. आम्ही तुम्हाला सांगतो की देशातील इलेक्ट्रिक ऑटो रिक्षासाठी हा एक उत्तम पर्याय बनू शकतो.